ताज्या बातम्या

तीन गावठी पिस्तूल घेऊन जाताना मोरचिडा शिवारात दोन आरोपी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी- चोपडा तालुका/ विनायक पाटील

चोपडा प्रतिनिधी..तालुक्यात सत्रासेन ते उमर्टी रोडवर मोरचिडा शिवारात गावापासून जवळपास नऊ किलोमीटर अंतरावर दोन आरोपी तीन गावठी पिस्तूल घेऊन जात असताना ग्रामीण पोलिसांनी त्यांना पकडून कारवाई केली आहे. दोन्ही आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे. 1 सप्टेंबर रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास आरोपी राजेंद्र दत्तात्रय मुसळे (वय 22) रा. उरुळी कांचन कोरेगाव रोड भुजनगर पुणे आणि अनिकेत सूर्यकांत पीठे (वय 24 वर्ष) राहणार उरळी कांचन तळवणी चौक पुणे हे दोन आरोपी व त्यांच्या ताब्यात असलेली मारुती सुझुकी कंपनीच्या स्विफ्ट कार मध्ये ( क्रमांक एम एच 12 यु सी 13 74) या कारमधून सीट खाली 25 हजार रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा तर दुसरा गावठी कट्टा 25 हजार रुपये किमतीचा आरोपी राजेंद्र मुसळे यांचे डावे बाजूला कमरेस लावलेला मिळून आला आणि तिसरा पंचवीस हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा हा आरोपी अनिकेत पीठे यांच्या डाव्या कमरेस लावलेला मिळून आला. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. त्यामुळे या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 10 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल 6 लाख रुपये किमतीची एक स्विफ्ट कार, 2 हजार 200 रुपये रोख आरोपी राजेंद्र मुसळे यांच्या जवळ मिळून आले. असा एकूण 6लाख 87 हजार 200 रुपयांचा ऐवज चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे तात्पुरता प्रभार असलेले व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री के. के. पाटील व पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सदर घटनेची पोलिसांना गुप्त माहिती प्राप्त झाल्याने पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मधील पोहेका किरण वासुदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी राजेंद्र मुसळे व अनिकेत सूर्यकांत पीठे यांच्या विरोधात कलम 3/25, 7/25 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *