दयानंद विद्यालयात विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
प्रतिनिधी बालाजी तोरणे पाटील, अहमदपूर
अहमदपूर – तालुक्यातील हाडोळती येथील दयानंद विद्यालय शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कौडगावे जी.व्ही.हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य व्यंकटराव मुळके,पोलीस पाटील बालाजी मिरकले, उत्तमराव यादव, शिवचंद्र क्षेत्रफळे ,कांबळे रमेश, कलवले पी.आर., शेख एस. एम., पठाण मुस्तफा, राम ढोबळे, दत्तात्रय सूर्यवंशी, मुख्याध्यापक अर्जुन कानवटे, पर्यवेक्षक अशोक कोटसूळवार आदी मान्यवर उपस्थित होते. गावात प्रभात फेरी काढून वृक्षारोपणाचे महत्त्व व शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थी, पालकांना सांगण्यात आले. प्रभात फेरीनंतर शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून एक मूल- एक वृक्ष ही योजना राबविण्यात आली . विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.