दहावी सीबीएससी परीक्षेत लिटिल ब्लॉसम स्कूलच्या विद्यार्थ्यांची 100% निकालासह उत्तुंग भरारी

धरणगाव येथील स्वर्गीय राहुल पाटील शैक्षणिक संस्था संचलित लिटिल ब्लॉसम स्कूल मधील विद्यार्थ्यांची शंभर टक्के निकालासह वैयक्तिक उत्तुंग भरारी. मेहनत केल्यावरच यश मिळते, यश मिळाल्यावर मिळतो तो आनंद. मेहनत तर सगळेच करतात पण यश त्यांनाच मिळतं जे कठीण मेहनत करतात. यशाची परंपरा कायम राखत धरणगाव तालुक्यातील लिटिल ब्लॉसम स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. धन्यवाद अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन यासह विद्यार्थ्यांची सीबीएससी बोर्डाच्या हिशोबाने जी तयारी शाळेतील शिक्षकांनी करून घेतली होती त्याचे फळ आज निकालामार्फत मिळाले जात 100% विद्यार्थी पास झाले असून शाळेच्या शिरपेच्या मानाचा तुरा रोडला आहे. सर्व विद्यार्थी पास झाले असून प्रथम पाच क्रमांकामध्ये उतीर्ण होण्याचा मान प्रथम मोनिका काबरा, द्वितीय रितेश चौधरी, तृतीय तनिष्का पाटील, चतुर्थ हर्षदा माळी व पाचवा क्रमांक चिराग महाजन या विद्यार्थ्याने पटकावला. विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आबासाहेब दीपक जाधव तसेच मुख्याध्यापिका सौ. ज्योती जाधव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
