दिव्यांगांना सर्व क्षेत्रात संधी उपलब्धतेसाठी समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी – पालकमंत्री गुलाबराव
पाटीलपालकमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणाऱ्या 7 तीनचाकी सायकलींचे वाटप
जळगाव/धरणगाव प्रतिनिधी दि. १४ – दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे ही जशी शासनाची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाची देखील आहे. दिव्यांग बांधवांना उपलब्ध करून दिलेल्या बॅटरीवरील सायकलींच्या माध्यमातून त्यांनी आपल्या दिव्यांगत्वावर मात करून सर्वसामान्य जीवन जगावे. दिव्यांग बांधवाना सक्षम आणि सशक्त बनविण्यासाठी राज्य व केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.आज धरणगाव येथिल नगरपालिका आवारात आयोजित जि.प.समाज कल्याण विभाग व दिव्यांग विकास महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात दिव्यांग बंधू भगिनींसाठी बॅटरीवर चालणाऱ्या 7 तीन चाकी सायकलींचे वाटप आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.समाजकल्याणच्या माध्यमातून दिव्यांगाना टिकाऊ आणि आधुनिक साहित्य पुरविण्यात येऊन त्यांना शारीरक,सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यास प्राधान्य देत त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न आहे. असे दिव्यांग विकास महासंघाचे तथा माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील सर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र कंखरे यांनी केले तर आभार संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी मानले.यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी सुशांत पाटील,नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते,समाजकल्याणचे भरत चौधरी,उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील सर,चर्मकार समाज नेते भानुदास आप्पा विसावे,तालुका अध्यक्ष संजय पाटील,गणेशकर,सहायक प्रकल्प अधिकारी तुषार सोनार,युनियन बँकेचे मॅनेजर वाल्मीक पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, विजय महाजन,वासुदेव चौधरी,नंदु पाटील,रविंद्र काबरा,महिला आघाडीच्या प्रिय इंगळे,भारती चौधरी,पुष्पा पाटील यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व दिव्यांग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकलींचे वाटपतरूणांना व्यवसायाची व रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या योजनांच्या माध्यमातून आज धरणगाव तालुक्यातील 7 दिव्यांग बांधवांना व्यावसायासाठी बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकलींचे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढील वाटचालीस दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या.तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी दिव्यांगांचा 5 टक्के निधी खर्च केला त्या सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कारही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.