ताज्या बातम्या

दुचाकी व ट्रकच्या अपघातात २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा-यावल रस्त्यावर पदममोहन मंगल कार्यालयसमोर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अडावदकडून चोपड्याकडे येणारा अज्ञात ट्रक व चोपड्याहून माचला (ता.चोपडा) येथे जाणारे मोटर सायकलस्वार व त्यांच्यात अपघात झाला. मोटरसायकल चालक हा जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.अडावदकडून भरधाव वेगात
येणारी एका अज्ञात ट्रकने समोरुन कुलदीप अशोक पगारे (वय २१) याचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर शवविच्छेदन विभागाचे प्रशांत पाटील (मामु) याने त्याला मयत स्थितीत उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकामध्ये आणले होते. दि ८ रोजी सकाळी शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात येईल. चोपडा शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मयत कुलदीपच्या पश्चात आई, वडील एक भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अपघाताचे वृत्त कळताच नातेवाईक मित्र मंडळी व गावचे उपसरपंच नितीन निकम यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *