ताज्या बातम्या

देवळा येथे पत्रकार हल्ल्याचा व्यक्त करण्यात आला निषेध

दहिवड प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर देवळा नाशिक

देवळा – पत्रकार संदिप महाजन यांच्यावर झालेल्या हल्या प्रकरणी नाशिक जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देवळा पोलीस स्टेशनचे सह्ययक पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांना देण्यात आले निवेदन.

पाचोरा (जि. जळगाव) येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ आज दिनांक १७ आँगस्ट रोजी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त केला असून देवळा पोलीस स्टेशनचे सह्ययक पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांना निवेदन दिले. त्या प्रंसगी तालुका अध्यक्ष जगदीश निकम, सरचिटणीस मनोज वैद्य, जिल्हा कार्यकारणी सदस्य विनोद पाटणी, माजी तालुकाध्यक्ष विशाल मराठे, वैभवदादा पवार, एकनाथ सावळा, सोपान सोनवणे, शरदजी पवार, योगेश ठाकरे, सुभाष चव्हाण, भगवान देवरे, अनिल पाटणी, दादा हिरे, माधव शिरसाठ, विष्णू जाधव आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *