देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला, ही गोष्ट कोणी विसरु शकत नाही : शिव व्याख्याते संजीव सोनवणे

धरणगाव प्रतिनिधी विनोद रोकडे
अलिकडच्या काळात या देशाने आणि जवानांनी देशाचं रक्षण करण्यासाठी एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आता होती. पण लाल महालात शायिस्तेखानाने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शिवछत्रपतींच्या काळात झाला, ही गोष्ट कोणी विसरु शकत नाही, अशा शब्दांत संजीव सोनवणे यांनी शिवाजी महाराज यांचा गौरव केला.शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वतीन शिव व्याख्याते संजीव सोनवणे यांचा व्याखान आयोजित केल होते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती. दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी होते. यावर मध्येमध्ये वाद पण होत असतात. खरंतर महाराजांची जयंती ही 365 दिवस साजरी व्हायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते. पण 365 दिवस साजरी करायची म्हणजे शिवचरित्रातून 365 दिवस काही ना काही बोध घेऊन रोजच्या आयुष्यात मार्गक्रमण केलं पाहिजे.राजमाता जिजाऊं पासून प्रेरणा व संस्कार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची स्थापना केली. जीवनात संकटे आली तरी त्यावर संयमाने कशी मात करावी, हे शिवचरित्रातून शिकावे. युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जीवनामध्ये यशस्वीपणे वाटचाल करावी. असे आवाहन शिव व्याख्याते संजीव सोनवणे यांनी केले. धरणगाव येथील शिवसेना कार्यालया समोरील साने प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकास शिवजयंतीनिमित्त प्रमुख व्याख्याते संजीव सोनवणे शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ ,जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील, रावेर लोकसभा जिल्हा प्रमुख दिपक राजपूत, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील , मा नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, मराठा समाजाचे नेते पी एम पाटील सर लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी उपजिल्हा प्रमुख ऍड शरद माळी संघटक राजेंद्र ठाकरे तालुका प्रमुख जयदीप पाटील शहर प्रमुख भागवत चौधरी उद्योग पती जीवन आप्पा बायस, ऍड वसंतराव भोलाने यांनी बुधवारी पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रम चे प्रास्ताविक गुलाबराव वाघ यांनी शिवसेना तर्फे 1984साल पासून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे तसेच शिवसेना कार्यालयावर तिरंगा ध्वजारोहण कार्यक्रम 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो तसेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तसेच शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात असे श्री वाघ यांनी केलेसंजीव सोनवणे सर पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आपणा सर्वांना कायम वाटचाल करावयाची आहे. छत्रपतींचा आदर्श हा समाजातील प्रत्येकासाठी यशस्वी जीवन जगण्यासाठी उत्तम आहे. शिवाजी महाराजांच्या मातीत आपण जन्मलो आहोत. शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र समाजाला कायमच प्रेरणा व स्फूर्ती देत राहील. असे मत व्यक्त केले वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न पहायचं, त्याची ध्येयधोरण आखायची आणि स्वतःच आर्थिक चलन आणायचं , फार्सी भाषा नाकारून स्वतःचा मराठी शब्दकोश निर्माण करायचा , पुढे एक एक किल्ले जिंकायचे आणि लहान वयातच पीछेहाट पण सहन करायची आणि हे करताना आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांचे मनोधैर्य कुठेही खचू द्यायचे नाही याला एक अद्वितीय प्रतिभाच असली पाहिजे. कार्यक्रम चे सूत्रसंचालन उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री यांनी तर आभार विनोद रोकडे यांनी मानले.