ताज्या बातम्या

दोंडाईचा येथील धोबी खलील हे शिक्षक संघटनेच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

पनवेल येथे पार पडलेल्या ४ थे महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघटनेतर्फे दिले जाणारे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 मा.आ.श्री प्रशांत ठाकूर (पनवेल) यांच्या अध्यक्षतेखालील देण्यात आले.या पुरस्कार सोहळ्यात दोंडाईचा नगर परिषद शाळा क्र. ११ चे शिक्षक धोबी खलील हमीद यांना त्यांच्या शैक्षणिक सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय कामात त्यांचे योगदान बद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

या प्रसंगी श्री. जयकुमार गोरे (आमदार माण,खटाव सातारा), श्री. अर्जुन जी कोळी (राज्य अध्यक्ष नपा.व मनपा शिक्षक संघ), संतोष भोसले (IIFL FINANCE GOLD LOAN), ज्योत्स्ना भरडा, उमेश भरडा (उद्योजक पनवेल),सुभाष कोल्हे, अरुण पवार, वैभव पाटील, साधना साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श प्रशासनाधिकारी, आदर्श तंत्रस्नेही शिक्षक आदी पुरस्कारांचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. शिक्षण विभाग प्रमुख वृंदावन पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी डी.एस. सोनवणे, केंद्र प्रमुख विकास देव्हारे, मुख्याध्यापक सलाहुद्दिन शेख, हबिबुर्रहेमान अन्सारी, प्रशांत आहिरे, अप्पासाहे लांबोळे, संजय चौधरी सलमान अन्सारी यांनी धोबी खलील हमीद यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *