ताज्या बातम्या

‘द ब्रेड ऑफ लाईफ डॉ. पांडुरंग खानखोजे – द अनसंग हिरो’ नाट्यप्रयोगाने जिंकली रसिकांची मने ; चोपडा येथे मसाप, रोटरी व हिंदी मंडळातर्फे आयोजन

द ब्रेड ऑफ लाईफ-डॉ. पांडुरंग खानखोजे – द अनसंग हिरो’चे चोपडा येथे झाले सादरीकरण

चोपडा – वर्धा जिल्ह्यातील क्रांतिकारी कृषी शास्त्रज्ञ पांडुरंग खानखोजे यांचे भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात मोठे योगदान आहे. त्यांचे कृषी क्षेत्रातील कार्य अनमोल आहे. तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी भारतातल्याच नव्हे तर परदेशातील भारतीयांचे संघटन करण्यात व स्वातंत्र्य लढ्यासाठी मदत मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक पांडुरंग खानखोजे यांच्या जीवनावर आधारित ‘द ब्रेड ऑफ लाईफ- डॉ खानखोजे: द अनसंग हिरो’ या नाट्यप्रयोगाचे चोपडा येथे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.         ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने केंद्र सरकार व सांस्कृतिक विभाग (नवी दिल्ली) आयोजित उपक्रमा अंतर्गत मेराकी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशन, नागपूर यांनी मंगला सानप (राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली) लिखित व दिग्दर्शित ‘द ब्रेड ऑफ लाईफ-डॉ. पांडुरंग खानखोजे – द अनसंग हिरो’या नाटकाचे रविवार दि. २८ जुलै रोजी  रात्री ८ वाजता नगरपरिषद नाट्यगृह चोपडा येथे सादरीकरण करण्यात आले. या नाट्यप्रयोगाची आयोजन चोपडा येथील महाराष्ट्र साहित्य परिषद रोटरी क्लब व राष्ट्रभाषा हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. यासाठी चोपडा नगर परिषदेचे सहकार्य लाभले.     

नाट्य प्रयोगाच्या प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे संस्थापक अध्यक्ष कवी अशोक सोनवणे, कार्याध्यक्ष विलास पी. पाटील, रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया, माजी सचिव रोटे. गौरव महाले, राष्ट्रभाषा हिंदी अध्यापक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ए. पी. पाटील, माजी अध्यक्ष पवन लाठी, मेराकी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशन (नागपूर) चे रुपेश पवार यांच्या उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पहिला ‘कवयित्री बहिणाबाई कृषी पुरस्कार’ प्राप्त प्रगतिशील शेतकरी ॲड हेमचंद्र दगाजी पाटील (पंचक) यांच्या हस्ते नटराजाचे व रंगमंचाचे पूजन करण्यात आले. चंद्र पाटलांचा पाटील यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी प्रस्ताविक विलास पाटील यांनी सूत्रसंचालन कार्यवाह संजय बारी यांनी तर आभार प्रदर्शन पवन लाठी यांनी केले.        

न. प. नाट्यगृहात झालेल्या या नाट्यप्रयोगामुळे ‘आज आम्हाला खानखोजेंबद्दल कळले, इतिहासातील अनेक घटना समोर आल्या, आजच्या तरुणाई मध्ये राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी यासाठी अशा उपक्रमाची नितांत गरज आहे, अशा व इतर अनेक प्रतिक्रिया नाट्यरसिकांकडून सातत्याने मिळत आहेत, हे या नाटकाचे यश म्हणतात येईल.        

पुष्पक भट, हर्षवर्धन देशमुख, कृष्णा लाटा, ऋतुराज वानखेड़े, शुभम गौतम, अविनाश अरोरा, श्रेयस भारसाकळे, कुणाल टोंगे, कुणाल मेश्राम, सिद्धांत पटेल, चैतन्य दुबे, अनुक्षा आर्गे, महक त्रिपाठी, निश्चय बेलानी, बुद्धांश, शुभम शेंडे, शुभ्रा पाटील, श्लोक पाटील यांनी या नाट्य प्रयोगात विविध भूमिका निभावल्या. तर प्रकाशयोजना अक्षय खोब्रागडे, संगीत संयोजन नारायण, संगीत संचालन निकीता ढाकुलकर,रंगभूषा व वेशभूषा ऋतुजा वानखेडे , नेपथ्य अलियर,  अंकित ठाकरे, शुभम गौतम, प्रबंध व समन्वयन हितेश यादव, मयूर मानकर यांचे तर कला सहायक रितेश, सिनोग्राफी अलियर यांची होती. विशेष सहाय्य सुनील खानखोजे व सावित्री पांडुरंग यांचे लाभले.नाट्यप्रयोगासाठी शहरातील नागरिक, विद्यार्थी, आयोजक संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *