ताज्या बातम्या

धरणगांव येथे एकलव्य संघटनेचे जागतीक आदिवासी दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन

धरणगांव – बुधवार रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून प्रदेशाध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एकलव्य संघटना प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री. सुधाकरराव वाघ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणगांव, येथे आदिवासी क्रांतिकारक भारतीय स्वतंत्र वीर खाज्या नाईक ( भिल्ल ) यांच्या समाधी स्थळी अभिवादन करून धरणगांव तालुक्यातील बाभळे बु, येथे एकलव्य संघटना शाखा उद्घाटन व समाजप्रबोधन करून कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगांव कार्यालयात भगवान एकलव्य व क्रांतिकारक स्वतंत्र वीर खाज्या नाईक ( भिल्ल ) यांची प्रतिमा पूजन व प्रतिमा भेट धरणगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती तथा एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय जुलाल पवार देण्यात आली.या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लताबाई पाटील शिवसेना तालुका अध्यक्ष गजानन नाना पाटील,तसेच एकलव्य संघटनेचे कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी जळगांव जिल्हाध्यक्ष श्री. संजय सोनवणे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार युवा जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनवणे अपंग सेल जिल्हाध्यक्ष श्री. ऋषिदादा सोनवणे जिल्हा संघटक श्री. पिंटूभाऊ गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष श्री.पिंटू गायकवाड धरणगांव तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती श्री. संजय पवार जळगांव तालुका अध्यक्ष राहुल ठाकरे,धरणगांव तालुक्यातील समाजसेवक रामलाल पवार,माजी सभापती पं.स.अनिल पाटील, शिवसेना विभाग प्रमुख टिकाराम पाटील, भरत मोरे,मकरंद सैंदाने कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य सचिव नवनाथ तायडे, उपसचिव मोरेश्र्वर पाटील,निंबा साळुंखे,मिलिंद दाभाडे,आनंदा पवार,राकेश पाटील, ऊन्मेश साळी,सर्व मार्केट कमीटी चे कर्मचारी वृंद व संचालक मंडळ आणि एकलव्य संघटनेचे तालुक्यातील सर्व कमिटी उपस्थितीत होते. आभार सचिव नवनाथ तायडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *