ताज्या बातम्या
धरणगाव तालुका बाळासाहेबांची शिवसेना उप तालुका प्रमुख पदी संजय चौधरी..
धरणगाव तालुक्याच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या उप तालुका प्रमुख पदी तिळवण तेली समाजाचे नवेगाव परिसरातील माजी नगराध्यक्ष संजय वामन चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल युवा सेनेचे नेते जि प सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. एसटी कामगार सेना तालुका प्रमुख पदी समाधान पाटील, शेतकरी सेनेच्या शहर प्रमुख पदी सत्यवान कंखरे, आदिवासी सेनेच्या शहर प्रमुख पदी नगरसेवक अजय चव्हाण यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते मा.ना. गुलाबरावजी पाटील साहेब, जिल्हा प्रमुख निलेश पाटील, उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, तालुका प्रमुख गजानन नाना पाटील व सर्व धरणगाव शहरातील नगरसेवक कार्यकर्त्यांनी सर्वांना निवडीबद्दल अभिनंदन केले.