धरणगाव तालुका शिवसेनेची बैठक संपन्न…
जळगांव – मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हे जळगाव जिल्ह्याचे दौऱ्यावर येत असून त्यानिमित्त तालुका शिवसेनेची बैठक व नवनिर्वाचित तालुका प्रमुख पदी डी ओ पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सत्कार आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपप्रमुख पी एम पाटील सर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर,मागासवर्ग जिल्हा प्रमुख मुकुंद नन्नवरे, मार्केट कमिटीचे सभापती गजानन नाना पाटील,तालुका प्रमुख डी ओ पाटील साहेब, तालुका उप प्रमुख मोती आप्पा पाटील,भगवान भाऊ महाजन,रवींद्र चव्हाण,युवा सेना उपजिल्हा प्रमुख भैया भाऊ महाजन,शहर प्रमुख विलास भाऊ महाजन,महिला तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील, युवा सेना तालुका प्रमुख दीपक भदाणे,युती तालुका प्रमुख प्रिया इंगळे,तालुका संघटक हेमंत चौधरी,नगरपालिकेचे गटनेते पप्पू भाऊ भावे, मान्यवर उपस्थित होते. जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले तालुक्यातील सर्व युवा सेना शिवसेना महिला आघाडी शेतकरी सेना सर्व कार्यकर्त्यांनी बूथ प्रमुखांची यादी तयार करून लवकरात लवकर जिल्हा पातळी पाठवून भविष्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सज्ज राहायचे आहे. शिंदे साहेब यांच्या दौऱ्यासाठी कार्यकर्त्यांनी पाचोरा येथे उपस्थित रहावे. कार्यक्रमाचे प्राथमिक संजय पाटील साहेब यांनी तर सूत्रसंचलन रवींद्र चव्हाण सर यांनी केले.
या प्रसंगी पी एम पाटील सर,गजानन नाना,डी ओ पाटील, तालुका प्रमुख भगवान भाऊ महाजन,मुकुंद नन्नवरे यांनी मार्गदर्शन केले आभार प्रदर्शन शहर प्रमुख विलास भाऊ महाजन यांनी मानले.