ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील ७००० दिव्यांग बांधवांना विविध प्रकारचे साहित्य मिळणार – पी एम पाटील सर

धरणगाव – तालुक्यातील सर्व दिव्यांगांना विविध प्रकारचे साहित्य मिळणार असल्याची माहिती पी एम पाटील सर यांनी दिली. धरणगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांची बैठक महाराष्ट्र दिव्यांग महासंघाच्या कार्यालयात नुकतीच संपन्न झाली.

या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष पी एम पाटील सर यांनी सांगितले कि, “दिनांक 3 जून रोजी सर्व दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप होणार असून एकही दिव्यांग बांधव साहित्य विना राहणार नाही. ज्या दिव्यांग बांधवांची याअगोदर तपासणी झाली असेल त्या सर्व दिव्यांग बांधवांचे साहित्य पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या निधीतून उपलब्ध झाले असून त्याचे वाटप 3 जून रोजी सकाळी १० वाजेला धरणगाव येथील कार्यालयात होणार आहे. तसेच ज्यांची तपासणी राहिली असेल त्यांची तपासणी करून त्यांनासुद्धा साहित्य मिळणार आहे”.

जळगाव ग्रामीण मधील जवळ जवळ ७ हजार दिव्यांग बांधव असून याआधी अनेक दिव्यांग बांधवांना साहित्य दिले गेले आहे. तरी ज्या दिव्यांग बांधव यांना साहित्य मिळालं नसेल त्यांना साहित्य मिळेल असे मार्गदर्शन पी एम पाटील सर यांनी केले.

पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून एकही दिव्यांग बांधव वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल ज्यांना रेशन कार्ड मिळाले नसेल, त्यांचे पगार झाले नसेल, अनेक विधवा महिला असतील, निराधार असतील, ज्येष्ठ नागरिक असेल अशा सर्वांना शासनाच्या सुविधा पुरवल्या जातील. हजारो बांधवांचे पगार सुरू आहेत. निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही असे पाटील साहेब यांनी सांगितले. जळगाव ग्रामीण मतदार संघातील सर्व दिव्यांग बांधवांनी 3 जून रोजी उपस्थित राहावे असे आव्हान पी एम पाटील सर यांनी केले आहे.

या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष अक्षय महाजन, तालुका प्रमुख संजय पाटील, उपप्रमुख अक्षय मृथा, सचिव राजेंद्र चव्हाण, जितेंद्र काबरा, धरणगाव तालुक्यातील शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांनी सुद्धा दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.