ताज्या बातम्या

धरणगाव नगरपालिका सेवकांची पतसंस्थेच्या चेअरमन पदी राजेंद्र माळी तर व्हाईस चेअरमन पदी गोपाल वाघरे यांची बिनविरोध निवड

जळगांव – धरणगाव नगरपालिका सेवकांची पतसंस्था ची सन 2023 ते 2028 या कालावधी साठी निवडणूक पार पाडली यावेळी चेअरमन पदी राजेंद्र माळी तर व्हाईस चेअरमन पदी गोपाल वाघरे यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी संचालक म्हणून सुरेश चौधरी, वसंत चव्हाण, भगवान माळी, इतवारी पचेरवार , गणेश पाटील, खंडू सोनवणे , जमाना मोरे अनिता बाविस्कर यांची संचालक पदी निवड करण्यात आली यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष सुरेखा ताई विजय महाजन, मा गटनेते पप्पु भावे सामाजिक कार्यकर्ते विनोद रोकडे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन एस शिंदे यांनी कामकाज पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *