धरणगाव नगरपालिकेत कुणबी पाटील नोंदी समितीचे काम युद्धपातळीवर सुरू
जळगांव – राज्य शासनाच्या निर्णय नुसार धरणगाव नगरपालिका मध्ये कुणबी पाटील नोंदी समिती गठीत करण्यात आली असून नगरपालिका चे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांचा नेतृत्वाखाली कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी हे कामकाज पाहत आहे , कुणबी पाटील नोंदी शोध मोहीम सुरू असून यात 1939 ते 1967 पर्यत मुळी लिपीत एकूण 29000 नोंदी असून त्यात कुणबी पाटील नोंदी 285.आहेत मोडी लिपीतील नोंदी शोधण्यासाठी तज्ञ तथागत सुरवाडे मोडीलिपी वाचक यांची मदत मिळत आहे तसेच देवनागरी लिपीतील कुणबी नोंदी अढले तर मोडी लिपीतील नोंदी शोधले जात आहे असे कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी यांनी सांगितले त्याना नगरपरिषद मधील कर निरीक्षक प्रणव पाटील ,जन्म मृत्यू लिपिक रितेश जोशी लिपिक अनिल पाटील , संजय शुक्ला नगरपालिका कर्मचारी सुरेश सोनवणे , दिपक वाघमारे, वसंत पारधी , सुरेश चौधरी सह कर्मचारी सहकारी सहकार्य करत आहे.