ताज्या बातम्या

धरणगाव : बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात “राजश्री छत्रपती शाहू महाराज” पुण्यतिथी साजरी

धरणगाव – येथील सारजाई दामोदर कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात आज 6मे रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ निमित्ताने पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस .एस. पाटील यांनी भारत माता व शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पूजन करून माल्यार्पण केले.प्रसंगी मिनाक्षी वारुळे व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चव्हाण यांनी केले.कार्यक्रम यशस्वी साठी सांस्कृतिक समिती प्रमुख कैलास माळी, सदस्य किरण चव्हाण, पल्लवी मोरे, सरोज तारे,रजनिराणी पवार,शीतल वानखेडे,नीता महाजन व परमेश्वर रोकडे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *