धरणगाव येथील लिटिल ब्लॉसम स्कूलची विद्यार्थिनी कल्पिता ची जिल्हास्तरीय स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

जळगांव – जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव शहर महानगरपालिका व जळगाव जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामनाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत आज दिनांक 10 ऑक्टोबर 2023 मंगळवार रोजी धरणगाव येथील लिटिल ब्लॉसम स्कूलची विद्यार्थिनी कल्पिता किशोर पाटील हिने भालाफेक या मैदानी क्रीडा प्रकारात उल्लेखनीय व नेत्र दीपक कामगिरी करत सर्वोत्तम भाला फेकून विभागीय स्तरावर आपली निवड निश्चित केली.धरणगाव या तालुकास्तरीय गावात राहून इतर तालुक्यातील सर्व मुलींना मागे टाकून जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत कल्पिताच्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सर्व पंच जिल्हा क्रीडा अधिकारी तालुका क्रीडा अधिकारी सर्वांनी कल्पिताच्या या चमकदार कामगिरीचे तोंड भरून कौतुक केले.अगदी नंबर प्रमाणे आपल्या यशाचे श्रेय शाळेला व शाळेतील क्रीडाशिक्षक पवन बारी यांना देऊन विद्यार्थिनीने आदर्श शिष्याचे कार्य चोखपणे पार पाडले. शाळेचे अध्यक्ष माननीय श्री आबासाहेब दीपक जाधव मुख्याध्यापिका ज्योती जाधव यांच्यासह, तालुका क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी व शाळेचे उपप्राचार्य योगेश करंदीकर सर क्रीडा शिक्षक पवन बारी सर यांनी विद्यार्थिनीच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
