धरणगाव येथील संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था येथे सावतामाळी युवक संघ चा वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने अल्पोपहार वाटपाचा कार्यक्रम संपन्न

धरणगाव – अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य धरणगाव शहराच्या सहकार्याने जळगाव येथील सौ, भारती वाणी मॅडम (पाणी गुणवत्ता व स्वच्छता सल्लागार जिल्हा परिषद) जळगाव यांच्या कडून त्यांची मुलगी कु. दिव्या वाणी हीचा वाढदिवसाच्या निमित्ताने धरणगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था धरणगाव येथील विद्यार्थ्यांना समेवेत वाढदिवस साजरा करण्यात आला,व सोबत अल्पोपहार कचोरी समोसा जिलेबी इ. उपहार देण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी वारकरी संप्रदायाचे मंहत महामंडलेश्वर भगवान दास बाबा ,म्हणाले की, अन्न हे पूर्णब्रह्म आहे व गरीबांना व अनाथांना खाऊ घालने सर्वात मोठे पुण्याचे काम आहे,असे म्हणत त्यांनी कु. दिव्याला* वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच धरणगाव येथील अखिल भारतीय संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य धरणगाव चा वतीने, कु. दिव्याला वाढदिवसा निमित्त भेट म्हणून शालेय उपयोगी कंपास पेटी देण्यात आली.