ताज्या बातम्या

धरणगाव येथे जिल्ह्यातील पतसंस्थांच्या संचालक, अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ; नोंदणीचे आवाहन

सहकार भारती जळगाव जिल्हा व धरणगाव येथील सर्व पतसंस्थांच्या वतीने धरणगाव येथे जिल्ह्यातील पतसंस्थांच्या संचालक, अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण वर्ग होणार संपन्न


धरणगांव प्रतिनिधि / विनोद रोकडे

जळगांव – “बिना संस्कार नहीं सहकार, बिना सहकार नहीं उध्दार” या ध्येयाने प्रेरित सहकार भारती, जळगाव जिल्हा व धरणगाव शहरातील सर्व पतसंस्थांच्या वतीने दिं. २० जानेवारी, २०२५, सोमवार रोजी स. १०ते ५ या वेळेत वाणी मंगल कार्यालय, धरणगाव येथे जिल्ह्यातील पतसंस्थांच्या संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्या साठी सहकार कायद्यातील तरतुदीनुसार प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे, या प्रशिक्षण वर्गाला जिल्ह्यातील पतसंस्थांनी सहभागी होण्यासाठी जिल्हा उप निबंधक यांचेमार्फत पत्रक काढले आहे. या वर्गात छत्रपती संभाजी नगर येथील वर्धमान पतसंस्था उपाध्यक्ष श्री. संभाजी राचुरे , आॅडीटर असोसिएशनचे श्री आबासाहेब देशमुख, जयदीप शाह ( बळवंत पतसंस्था, जळगाव) धरणगाव अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराथी, धरणगाव सहाय्यक निबंधक विशाल ठाकुर हे मार्गदर्शन करणार आहेत. तर उद्घाटनप्रसंगी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे, सहकार भारतीचे राष्ट्रीय मंत्री दिलीप रामू पाटील, महिला प्रमुख श्रीमती रेवती शेंदुर्णीकर व जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्राहास गुजराथी हे मान्यवर उपस्थित रहातील. या वर्गाच्य नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व पतसंस्थानी सहकार भारती धरणगाव शहर प्रमुख उमेश चौधरी, श्री व्यंकटेश पतसंस्थेचे व्यवस्थापक किरण वाणी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, महामंत्री शशीकांत बेहेडे, जिल्हा पतसंस्था प्रकोष्ट प्रमुख प्रशांत केले धरणगाव तालुका प्रमुख हेमंत जोशी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *