धरणगाव येथे धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता अभियान…

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे धरणगाव येथे
धरणगाव — महाराष्ट्र भूषण डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड यांच्या सौजन्याने पद्मश्री भूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून*स्वच्छता ही सेवा* या उद्देशाने ०१ मार्च नानासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून आज दि. ०२ मार्च २०२५ रोजी धरणगाव तालुक्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
स्वच्छता अभियान उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, भाजपा गटनेते कैलास माळी सर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस श.प.पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील सर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
सदर अभियानात श्रीबैठक धरणगाव, पिंप्री, बिलखेडा, पाळधी, सोनवद येथील एकूण सदस्य हजर होते. श्री सदस्यांनी सकाळी ०९ ते ११ ह्या वेळेत स्वच्छता अभियान राबवले त्यात एकूण ओला व कोरडा कचरा २ टन १७५ किलो जमा केला गेला. या स्वच्छता अभियानात एकूण १८८ श्री सदस्यांनी सहभाग नोंदवला.