धरणगाव येथे पोलिस महासंचालकांच्या पथकाने गुन्हा दाखल केलेल्या रेशनमालाचे पुढे काय ?

धरणगाव – शहरात चोपडा रस्त्यावरील कमल जिनिंग मधील धान्य गोदामावर नाशिकच्या पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने गुरुवार रोजी धाड टाकली. यात मोठ्या प्रमाणात धान्य साठ्यासह वाहन जप्त करण्यात आले होते. गोपनिय माहितीनुसार नाशिक च्या पथकाने गहू आणि तांदूळ जप्त केला आहे. या जप्त केलेल्या मालाचा पंचनामा करण्यात आला होता मात्र गुन्हा दाखल झालेला नसल्याने तर्क वितर्क लढविण्यात येत होते. अखेर दोन दिवसानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी आज दिली होती.
परंतु सदर मालाचे पुढे काय झाले ? याबाबत मोठ्या प्रमाणात तर्क वितर्क लढविले जात आहेत. इतकेच नव्हे तर सध्या पुन्हा कमल जिनिंग येथे धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी पुरवठा अधिकारी यांच्या संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.