धरणगाव सकल नाभिक समाज दुकानदार संघटना अध्यक्षपदी सतीश बोरसे तर उपाध्यक्ष पदी गणेश झुंजारराव यांची निवड

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव शहर सकल नाभिक समाज दुकानदार संघटना ची बैठक संपन्न झाली.त्यात शहरातील सर्व दुकानदार समाज बांधव उपस्थित होते. सलून कामाचे साहित्य चे दर दररोज वाढत आहेत,तसेच सर्व जीवनावश्यक वस्तूचे भाव सुद्धा वाढत असल्याने सलून व्यावसायिक बांधव यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याने दाढी कटिंग चे दर वाढवून वीस टक्के वाढ आज करण्यात आली.सदर बैठकीत अध्यक्ष पदी सतीश बोरसे यांची तर उपाध्यक्ष पदी गणेश झुंजारराव यांची नीवळ करण्यात आली.तर सचिव पदी,गणेश मधुकर निकम, सह सचिव गणेश कांतीलाल गायकवाड.सेक्रेटरी,गोपाळ काशिनाथ फुलपगार,खजिनदार दिगंबर मिठाराम निकम,संस्था सदस्य म्हणून संजय लहू झुंजारराव,भूषण लक्ष्मण वारुडे.सल्लागार म्हणून,आनंद फुलपगार,राजेंद्र फुलपगार,कमलेश बोरसे,राजेंद्र बोरसे,ज्ञानेश्वर झुंजाररांव,दीपक झुंजारराव,किरण गायकवाड,निलेश कुवर,रवी निकम,महेश निकम,संदीप निकम,अजय निकम,गजानन सोनवणे,सुधाकर फुलपगार यांची निवळ करण्यात आली.सदर बैठकीस किशोर झुंजारराव,समाधान निकम,सचिन झुंजारराव,स्वप्नील झुंजारराव,विशाल फुलपागार,सुभाष बोरसे,दिनेश बोरसे,कैलास झुंजारराव,प्रवीण निकम,राहुल निकम,प्रदीप झुंजारराव,युवराज इंगळे,प्रशांत फुलपागार,महेश फुलपागार,मनोहर निकम यांच्या सह असंख्य समाज बांधव बैठकीस उपस्थित होते.