ताज्या बातम्या

धरणगाव : साळवे इंग्रजी विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले…

धरणगाव : साळवे येथील ग्राम सुधारणा मंडळ संचलित साळवे इंग्रजी विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय आणि प. पू.साने गुरुजी प्राथमिक सेमी विद्यालय, साळवे. येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन डॉ गिरीश नारखेडे शालेय समितीचे अध्यक्ष डॉ शशिकांत नारखेडे, सदस्य लिलाधर ब-हाटे, मुख्याध्यापक ए एस पाटील,सर्व शिक्षक व्रुंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र गीत सामूहिक गायन घेण्यात आले. नंतर ईयत्ता पहिली ते नववी व अकरावीत प्रथम व्दितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन एस डी मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी क्रिडा शिक्षक बी आर बोरोले, व्ही एस कांयदे, कलाशिक्षक एस पी तायडे व ए वाय शिंगाणे इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *