ताज्या बातम्या

धूम स्टाईलने १७ ग्राम सोन्याची मंगल पोत लांबवून चोरटे पसार ; चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा : दिनांक १६ रोजी सायंकाळी ०६.४५ ते ०७.०० वा. च्या सुमारास चोपडा शहरात गौतम नगर भागात मातोश्री बिल्डीग विशाल सलुन जवळ रोडवर २८ते ३० वयोगटातील २ युवकांनी त्याचा जवळ असलेली विना क्रमांकाची फल्सर मो.सा.ने होती. फिर्यादी हे पायी रोडने जात असतांना त्यांचे समोरुन येवुन फिर्यादी सौ आशा प्रल्हाद बिऱ्हाडे यांनी गळ्यात परीधान केलेली ८०,०००/-रु.कि.ची १७ ग्रॅम वजनाची दोन सरी असलेली दोन सोन्याच्या वाट्या असलेली मंगल पोत ही जबरदस्तीने तोडून जबरी चोरी करुन घेवुन प्रसार झाले म्हणून चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांचा मार्गदर्शनात उप निरीक्षक जितेंद्र वल्टे करत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *