महाराष्ट्र

नंदुरबार : खापर येथे पोपटराव सोनवणे यांचा खापर येथे माळी समाजातर्फे सपत्नीक सत्कार

खापर – संत शिरोमणी श्री संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय माळी समाज फेडरेशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व वधू वर सूचक व्हाट्सअप गृपचे सर्वे सर्वा श्री पोपटराव सोनवणे यांनी आपल्या वधू वर सूचक ग्रुपच्या माध्यमातून १३८ विवाह जुळविल्याबददल त्यांचा खापर ता. अक्कलकुवा जि नंदुरबार येथे माळी समाज तर्फे प्राध्यापक सुर्यवंशी सर यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.

धकाधकीच्या जीवनात आपले घर प्रपंच चालविण्यासाठी सतत व्यस्त असलेल्या नवं वधू वर पालकांना आपल्या नवं वधू वरांचे लग्न जमविण्यासाठी व्हाट्सअप वधू वर सूचक गृपचा मोठा आधार मिळाला आहे पोपटराव सोनवणे यांचा व्हाट्सअप वधू वर सूचक गृप मधे संपूर्णपणे मोफत सेवा दिली जाते या गृप मधे सामील होणाऱ्या नवं वधू वर पालकांनकळून कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता येथेचित सहकार्य केले जात असल्याने माळी समाजातील नागरिक श्री पोपट सोनवणे यांनी तयार केलेल्या व्हाट्सअप वधू वर सूचक गृपची प्राधान्याने निवड करत असल्याचे दिसून येत आहे या ग्रुपच्या माध्यमातून पोपटराव सोनवणे व त्यांचे चिरंजीव रामदास सोनवणे यांनी आतापर्यंत १३८ नवं वधू वरांचे लग्न जमविले आहे त्यांच्या या भरीव कामगिरीची दखल घेत खापर येथील माळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक श्री सुर्यवंशी सर यांच्या शुभहस्ते श्री पोपटराव सोनवणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

शेवटच्या श्वासापर्यंत आपण व्हाट्सअप वधू वर सूचक गृपचा माध्यमातून लग्न जमविण्याचे काम करत राहणार असल्याचे अखिल भारतीय माळी समाज फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री पोपटराव सोनवणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *