ताज्या बातम्या

नवोन्मेमेष जेष्ठ नागरीक संघ कार्यकारिणी जाहिर ; अध्यक्षपदी प्रा.बी.एन.चौधरी, सचिवपदी मुकेश तिवारी

धरणगाव (प्रतिनिधी) : विनोद रोकडे

धरणगांव – येथे नव्याने स्थापन झालेल्या नवोन्मेश जेष्ठ नागरीक संघाची प्राथमिक आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी प्रा.बी.एन.चौधरी यांची तर सचिवपदी मुकेश विश्वमोहन तिवारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सौ. अरुणा दिलिपराव पाटील, सहसचिवपदी सुधाकर शंकर विसावे तर कोषाध्यक्षपदी वाय. डी. महाजन यांची निवड करण्यात आली. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डि. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. पुढील तीन वर्षासाठी ही कार्यकारिणी काम बघणार आहे.

जेष्ठ नागरिक संघात मार्गदर्शक म्हणून प्रा. आर. एन. महाजन, सुरेश सिताराम चौधरी, डी. जी. पाटील, प्रा. सी. एस. पाटील हे मार्गदर्शन कलतील. कार्यकारिणी सदस्य म्हणून, जयेश रामलाल भावसार, प्रा. अरुण गुलाबराव शिंदे, नितिनचंद्र रसिकलाल गुजराथी, प्रफुल्ल गुलाबदास जैन, राजेश शिशुपाल डहाळे, दमयंतीताई रघुनाथ पाटील, प्रा. रविंद्र निळकंठ भदाणे, विवेक रत्नाकर लाड, विराग गोपाळ वाजपेयी, कांतिलाल उखालाल कुमट यांचा समावेश आहे. नुतन कार्यकारीची नोद फेसकाॅमच्या धुळ येथील विभागीय आणि मुंबईच्या राज्य संघटनेकडे करण्यात आली आहे.

फेसकाॅमचे विभागीय अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य बी. एन. पाटील, जिल्हा समन्वयक एस. बी. महाजन, एरंडोल जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष अरुण महाजन, सचिव विनायक कुलकर्णी, सदस्य निंबा बडगुजर, पी. जी. चौधरीसह अनेकांनी नुतन कार्यकारिणीचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. जेष्ठ नागरीकांचे संघटन करुन त्यांचा समन्वय घडवून आणणे, आरोग्य विषयक समस्यांवर सामुहूक चर्चा करणे, वाचलेल्या पुस्तकांवर आस्वादक मंथन करणे आणि मनोरंजनात्मक तथा योगाभ्यास विषयक कार्यक्रमांचे आयोजन करणे यासारखे उपक्रम संघातर्फे राबविण्यात येतील असे अध्यक्ष प्रा. बी.एन.चौधरी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *