नव्याने बस सुरू झाल्याने निर्भय महाराष्ट्र पार्टीने केले बस चे पूजन
नाशिक – निर्भय महाराष्ट्र पार्टीचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांचे प्रयत्नाने पिंपळगाव, बसवंत डेपोची बस दिंडोरी, नळवाडपाडा, ठेपनपाडा, श्रीरामनगर, जोरणपाडा, साद्राळे, कवडासर, देवघर, चिल्हारपाडा, ननाशी या मार्गावरून आज नविन बस सेवा चालु करण्यात आली यावेळेस प्रत्येक गावात नागरिकांनी बस पुजण आनंदात केल. बसचे चालक एस गुरुड, वाहक एम.संनसारे यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. निर्भय महाराष्ट्र पार्टीने जनतेचे प्रश्न सोडविण्यात यश मिळवले आहे. तसेच नामदेव गावित जिल्हा उपाध्यक्ष हे ग्रामीण भागातील असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी लढा देत आहेत. यावेळेस जोरण, ग्रामपंचायत सरपंच गोविंद गायकवाड, ग्रामसेवक संदिप चारुडे, दिगंबर गायकवाड, पाडुरंग गावंढे, जाधव रामदास भोये, हेमंत भुसारे, पोलिस पाटील मोहन महाले, छगन भुसारे, ज्ञानेश्वर इंगळे, कवडासर, सरपंच मधुकर कराटे, देवगघर जाधव, सरपंच यांनी सर्वांनी बस वाहन चालक व वाहक यांना शाल श्रीफल देऊन सत्कार केला.