ताज्या बातम्या
नांदेडचे कॉंग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच दुःखद निधन
नांदेड : जिल्ह्याचे कॉंग्रेस पक्षाचे खासदार वसंत चव्हाण याचे आज हैद्राबाद येथे निधन झाले.त्यांच्यावर हैद्राबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपूर्वी खा चव्हाण यांना श्वास घेण्यास त्रास होतं होता. त्यामुळे त्यांना नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी हैद्राबाद येथील किम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते.अखेर आज सकाळी साडेपाच वाजता त्यांचं दुःखद निधन झाले. खा .वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.उद्या दिनांक 27रोजी नायगाव येथे अंत्यविधी होणार आहे हनुमान मंदिराच्या बाजूस सकाळी 11 वाजता होणार आहे.