ताज्या बातम्या

नांदेडमध्ये महायुती मेळावा; भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादीसह विविध नेते एकत्र येणार..!

राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांची पालक म्हणून नियुक्ती

नांदेड : जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने महायुतीतील घटक पक्ष कामाला लागले आहेत. विविध पक्षांचे स्वतंत्र मेळावे झाल्यानंतर आज रविवारी महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) सह महायुतीतील जिल्ह्यातील सर्वच नेते एका व्यासपीठावर येणार आहेत. यात महायुतीकडून अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांना या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक तथा म्हणून नियुक्त केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील घटक पक्ष कामाला लागले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा मेळावा घेतल्या जात आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीसह सहयोगी पक्ष महायुती समन्वय समितीने लोकसभा निवडणूकी डोळयासमोर ठेवून महाराष्ट्रातील ३६ विभागीय जिल्हयामध्ये रविवार दि. १४ जानेवारी महायुतीचे मेळावे आयोजित करण्याचे ठरविले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार प्रदेशाध्यक्ष भाजपा चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व शिवसेनेचे समन्वयक खा. राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हयाचे पालक म्हणून राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नांदेड येथील या मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शन करावे अशा सूचना एका पत्राद्वारे दिल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी राज्यातील महायुतीतील प्रमुख नेत्यांना अनेक जिल्ह्यात स्थान देण्यात आले आहे. नांदेडसाठी पालक म्हणून अजित पवार राष्ट्रवादीने उमेश पाटील यांना संधी नेमणूक केली आहे.हा मेळावा रविवारी नांदेड येथील मातोश्री मंगल कार्यालयात सकाळी ११.३० वाजता संपन्न होणार आहे.

या मेळाव्यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.हेमंत पाटील, आ.बालाजी कल्याणकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. भीमराव केराम, आ.तुषार राठोड, आ.राजेश पवार, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माधवराव किन्हाळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, सुधाकर भोयर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, विश्वांभर पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील, उमेश मुंडे, बाबुराव कदम, रिपाइंचे श्री सोनवणे सह महायुतीतील सर्व १५ पक्षाचे खासदार, आमदार, प्रदेश जिल्हा व तालुका प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील महायुतीतील लोकप्रतिनिधी व पक्षातील यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुती संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *