नांदेड-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्या : वसंत सुगावे पाटील

लोकनायक न्युज करिता प्रतिनीधी शंकर आडकिने नायगाव
नांदेड – जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी होऊन शेती पूर्णतः पाण्याखाली गेली असून अशा शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा घुंगराळा ग्रामपंचायतचे उपसरपंच वसंत सुगावे पाटील यांनी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. महेश वडदकर यांच्याकडे केली आहे.

या अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली असून अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत. अनेकांच्या घरात पाणी गेल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडला आहे. व शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच पेरणी केली होती आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मूग,उडीद, कापूस ,ज्वारी आदी पिके पावसात वाहून गेली.
अशातच अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे अशी मागणी या निवेदनात केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय आघाडी चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष संतोष दगडगावकर,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष संभाजी पा. मुकनर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कंधार तालुकाध्यक्ष माधव कदम,राष्ट्रवादी काँग्रेस चे मुखेड शहर कार्याध्यक्ष जयभीम सोनकांबळे, सुभाषराव रावणगावकर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धर्माबाद तालुकाध्यक्ष हणमंत पा. जगदंबे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे धर्माबाद तालुकाध्यक्ष नागेंद्र पा. चोळाखेकर, सुनील यलपलवाड आदी उपस्थित होते.