ताज्या बातम्या
नांदेड – जिल्हा परिषद शहापूर च्या विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश
प्रतिनिधी – भीमराव दिपके, देगलूर
देगलूर – आज घोषित झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालामध्ये देगलूर तालुक्यातील नावाजलेली असलेलीं शाळा शहापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल एसएससी चा एकूण निकाल 79. 71 टक्के लागला आहे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेमध्ये जिल्हा परिषद शहापूर येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे त्यामध्ये
- प्रथम क्रमांक.कु .संजना पिराजी इबितवार 90. 60 टक्के
- द्वितीय क्रमांक कु .स्नेहा लिंगारेडी चामावार 87 .80
- तृतीय क्रमांक प्रणव गोपाल इल्ते पवार 83.00
या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे शाळेचा निकालाचा उच्चांक गाठलेला आहे या भागातील सर्वाधिक निकाल देणारीजिल्हा परिषदेची सर्वात मोठी शाळा आहे गुणवत्तेच्या बाबतीत आजपर्यंत या शाळेतील अनेक विद्यार्थी मोठ्या पदापर्यंत यश संपादन केले आहेत.या यशाबद्दल शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाळ चामावार उपाध्यक्ष राहुल चिंतावार व शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.