ताज्या बातम्या

नांदेड-नायगांव तालुक्यात संततधार पावसाने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

घराची पडझड होऊन नुकसान ; बुधवारच्या रात्रीपासून संततधार पाऊस

लोकनायक न्युज प्रतिनिधी, लालसिंग रानडे नायगाव, नांदेड

नायगाव तालुक्यात बुधवारी रात्री आठच्या सुमारास पासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे काळ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे संतत  दुसऱ्याही दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले आहे.तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.ग्रामीण भागात घराची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. होळाच्या शेजारील शेतातील पिकांसह माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.                

तालुक्यातील काही मंडळात अतिवृष्टी झाली असून .गुरुवारी दिवसभर ढग दाटून आले होते.सकाळ पासूनच जोरदार पाऊस चालू असल्याने घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.शहरातील रस्ते, नाल्याना पुर परिस्थिती निर्माण झाली होती.कुंटूर मंडळातील हुस्सा येथील फुलांवरुन पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.रस्त्यासह फुले वाहून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.                  

कापूस,सोयाबीन पिकात पाणी साचून असल्याने पिके पिवळे होऊन करपून जाणाऱ्यांची शकतात आहे.अनेक शेतीचे बाध वाहून नुकसान झाले आहे. सलग दोन दिवस संततधार पाऊस असल्याने काळ्या पिकांची नासाडी होत आहे.कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची अवश्यकता आहे.संततधार पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून जनावरे दावणीला बादुन आहेत. छप्पर गळतीने जनावरे ओलेचिंब होऊन आरडाओरडा करित आहेत.पाऊस काय थांबायला तयार नाही.त्यामुळे जनावराचे बेहाल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *