ताज्या बातम्या

नांदेड – भास्कर भेदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी – एल.बी.रानडे

नायगांव – फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच चे संस्थापक अध्यक्ष भास्कर भेदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय विश्रामगृह नरसी ता.नायगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.किनाळा येथील माधव मोरे यांची मुलगी मयुरी मोरे हिने दहावी ला 93 तर बारावी ला 83 टक्के मिळविल्या बद्दल अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देगलूर येथील प्रा. उत्तम कुमार कांबळे सर, अंजनी हॉस्पिटल नायगाव येथील डॉ. शिवाजी काकडे, बिलोली येथून पत्रकार जयवर्धन भोसेकर, स्वर्गीय रावसाहेब अंतापुरकर प्रतिष्ठानचे ब्रह्मा कांबळे, अंकुश वाघमारे, चिटमोगरा येथील युवा उद्योजक माधव स्वामी, नरसी येथिल माऊली ज्वेलर्स चे संजय किनाळकर, जिगळा येथील उपसरपंच नागसेन जिगळेकर, रामतीर्थ ग्रामपंचायत सदस्य सुनील कांबळे, प्रा. विशाल बोरगावकर, फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच चे उपाध्यक्ष गौस भाई शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच चे युवा नेते इंद्रजीत डुमणे, प्रवक्ते प्रकाश होनसांगडे, पत्रकार खाजाभाई शेख, किरण इंगळे, जयपाल कांबळे, मुनेश्वर सोनकांबळे ,निळकंठ तरटे, प्रवीण भालेराव, किशोर वाघमारे, सुभाष गायकवाड यासह फुले शाहू आंबेडकर क्रांती म्हणजे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *