ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या मुकुंद आहेरची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विक्रमी कामगिरी…

प्रतिनिधी – आनिल धामणे

कॉमनवेल्थ चँपियनशिप मध्ये जिंकले भारतासाठी दोन सुवर्णपदके….

नाशिक – उत्तर प्रदेश नोएडा येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ चँपियनशिप मध्ये मनमाडच्या जय भवानी व्यायामशाळेचा राष्ट्रीय विक्रमवीर आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर याने आपल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 106 किलो स्नॅच व 133 किलो क्लीन जर्क असे 239 किलो वजन उचलून ज्युनियर व सीनियर या दोन्ही गटात दोन सुवर्णपदके पटकावीत भारतीय संघासाठी ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
मुकुंद आहेर यास भारतीय संघाची प्रशिक्षक तृप्ती पाराशर व छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *