नाशिक-सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; नांदगाव तालुक्यातील हॉटेल वृंदावन वर नाशिकच्या पथकाचा छापा
लोकनायक न्युज करिता प्रतिनिधी, अनिल धामणे, नांदगाव जिल्हा नाशिक
नाशिक – नांदगाव तालुक्यातील सगऴयात मोठ्या रॅकेटचा अखेर नाशिकच्या पोलिस पथकाने पर्दाफाश केला आहे. गेल्या काही वर्षांपासुन सुरु असलेल्या या धंद्यावर वरिष्ठ स्तरावरून कारवाई झाल्याने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे.
नाशिक जिल्हातील अवैध धंधे व्यवसायकांचा कर्दन काऴ म्हणून जी ओऴख आहे, ती म्हणजे, पोलिस अधिक्षक शहाजी उमाप. पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, नाशिक जिल्हा यांच्या मागदर्शन व आदेशानुसार काल बुधवार रोजी नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारातील नाग्या-साग्या धरणा लगत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
गेली सहा-सात वर्षा पासुन अल्पवयीन मुले-मुली तसेच शहरातील काही मंडऴी यांचे या परिसरातील हॉटेल वृंदावन येथे येणे जाणे होते. याठिकाणी वेश्या व्यवसाय राजरोस पणे खुलेआम सुरु होता. नाशिक पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने हॉटेल वृंदावनवर दुपारी एकच्या सुमारास एक डमी ग्राहक याठिकाणी पाठविला. त्यानुसार १३०० रुपयात सौदा ठरला. यावेळी देह विक्री करीता पिडीत महिला हजर झाली असता पथकाने अचानक छापा टाकला. याठिकाणी हॉटेल वृंदावन चालक संशियत आरोपी अख्तार सोनावाला, भालु मुल्ला यांच्यासह दोन पीड़ित महिला यांना सुमारे ४ वाजेच्या दरम्यान रंगेहाथ पकडले. संशयितांवर नांदगाव पोलिस स्थानकात भादवी कलम 3, 4, 5, 6, अनैतिक संबंध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, उप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, उप विभागीय अधीक्षक सोहल शेख, नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मागदर्शन खाली नाशिक पोलिस पथकातील पोलीस उप निरीक्षक अंकिता बाविस्कर, पोलिस हवालदार रावसाहेब कांबऴे, नितिन डावकर, पोलिस शिपाई मनोहर देशमुख रामराजे, चालक महेश पवार, महिला पोलिस शिपाई मनिषा कुजुरे यांच्या पथकाने सदर कारवाई केली. केलेल्या या कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.