जळगांव जिल्हा

निमगाव येथे ट्रक्टरखाली आल्याने विद्यार्थीचे जागीच मृत्यू

प्रतिनिधि – अमीर पटेल

यावल – तालुक्यातील निमगाव येथे यावल-भुसावल मार्गावरील नयनसिंग पाटील यांच्या शेताजवळच्या रस्त्यावर ऊस वाहतुक करणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने झालेल्या अपघातात १२ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज दि.२० डिसेंबर बुधवार रोजी घडली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील निमगाव येथील रहिवाशी आनंद रघुनाथ सोनवणे वय १२ वर्ष हा सदरील विद्यार्थी आज दि.२० डिसेंबर बुधवार रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास यावलहुन भुसावळमार्ग मुक्ताईनगर येथे उस वाहतुक करणाऱ्या महेन्द्रा कंपनीच्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९ डीएफ २५३५ हे जात असतांना निमगावजवळ नयनसिंग खुबसिंग पाटील यांच्या शेताजवळील रस्त्यावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टर हे भरधाव वेगाने जात असतांना ट्रॅक्टरच्या मागीत ट्रॉलीच्या चाकाखाली आल्याने सदरील आनंद सोनवणे या बालकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली.याबाबत मयताचे काका किरण फकीरा कोळी यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने ट्रॅक्टर चालक सोनु छोटू पारधे राहणार डोडीकर तालुका चाळीसगाव याच्याविरुद्ध अपघातास कारणीभुत म्हणुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी उमेश सानप हे करीत आहे.दरम्यान मयत मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रूग्णालयात डॉ प्रशांत जावळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *