पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे शिक्षक कार्य गौरव पुरस्कारासाठी आर डी पाटील व विजया पाटील यांची निवड
प्रतिनिधी विनायक पाटील
पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांच्या संकल्पनेतून शिक्षक कार्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले. सन २०२४ या पुरस्कारासाठी प्राथमिक विभागाचे आर डी पाटील व माध्यमिक विभागाच्या विजया पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र ५ सप्टेंबर शिक्षक दिनी संस्थेचे युवा संचालक पंकज बोरोले यांच्या हस्ते देण्यात आले. सदर प्रसंगी विभागप्रमुख उपस्थित होते.
सदर पुरस्कार निवडी साठी काही निकष ठेवण्यात आले होते त्यात शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक पात्रता वाढीसाठी केलेले प्रयत्न, संशोधनपर निबंध ,वृत्तपत्र / नियतकालिकात प्रकाशित लेख / ग्रंथलेखन / प्रकाशित पुस्तके, वर्गातील विद्यार्थ्यास विविध क्षेत्रात प्राप्त यश / निवड / पुरस्कार,शाळेसाठी समाजाकडून मिळविलेले योगदान ,अध्यापनातील विविध प्रयोग / नवोपक्रम ,कुशाग्र व अध्ययनात गती कमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केलेले विशेष प्रयत्न, विविध कार्यशाळेत सहभाग व प्रमाणपत्र इत्यादी बाबींचा समावेश होता.
आर डी पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यीक आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. तर विजया पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात विविध नवोपक्रम राबविले आहेत.
येत्या काही दिवसांत संस्थेतर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून सदर कार्य गौरव सन्मान दिला जाईल असे पंकज बोरोले यांनी सांगितले.
सन्मान प्राप्त शिक्षकांचे संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक नारायण बोरोले, भागवत भारंबे, गोकुळ भोळे ,सचिव अशोक कोल्हे , विभाग प्रमुख सर्व शिक्षक वृंद कर्मचारी यांनी अभिनंदन केले.