पंचायत समिती चोपडा अंतर्गत “आमचा गाव आमचा विकास” आराखडा बाबत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न !

चोपडा / प्रतिनिधी-विनायक पाटील
आज दि.११.०१.२०२४ रोजी पंचायत समिती चोपडा यांचे मार्फत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन-२०२४-२५ या वर्षाचा “आमचा गाव आमचा विकास” आराखडा बाबत, समर्थ पॅलेस येथे तालुका स्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्या वेळी तालुक्यातील सर्व सरपंच ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी, प्रभारी अधिकारी, अंगणावाडी पर्यवेक्षीका, तालुका स्तरीय सर्व अधिकारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण उपस्थित होते.
सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक देवेंद्र पाटील व प्रदिप बाविस्कर यांनी केले. व प्रशिक्षण सत्राचे उद्घाटक म्हणुन आपल्या चोपडा तालुक्याचे आमादर ताईसो सौ. लताताई चंद्रकांतजी सोनवणे यांनी दिपप्रज्वलन करुन उद्घाटन केले. त्यावेळी सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थीना आमदार सौ. लताताईंनी सुचना दिल्यात. ग्रामपंचायतीने तयार केलेले ग्रामविकास आराखडे, प्रत्यक्ष प्राप्त निधी, हाती घेतलेली कामे, पूर्ण कामे, अपूर्ण कामे, झालेला खर्च, शिल्लक निधी याची माहिती; त्याचप्रमाणे पुढील पाच वर्षांत वर्षनिहाय ग्रामपंचायतीस उपलब्ध होणारा अपेक्षित निधी इत्यादी माहिती ग्रामसभेसमोर ठेवून त्यावर चर्चा करावी. ग्रामसभेमध्ये राज्य व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी सादर केलेली माहिती विचारात घ्यावी. मिशन अंत्योदय अंतर्गत सर्वेक्षणातील माहिती व स्वयंसहायता गटामार्फत तयार करण्यात आलेला दारिद्यनिर्मूलन सूक्ष्म आराखडा व विविध सर्वेक्षणातील गावातील संबंधित माहिती बाबत चर्चा करावी व त्या नुसार आराखडा तयार करावा. आपल्या परिसरातील विकसित गावांना क्षेत्रीयभेटी देवुन त्यांचे विकास काम पाहणी करावी. व चांगल्या कामांचे अनुकरन करावे. असे सांगुन ताईंनी प्रशिक्षणार्थीना ग्राम विकास आराखडा तयार करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा…!
या दरम्यान गट विकास अधिकारी यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळा, अंगणवाड्या यांच्या कामकाजाच्या अहवालाबाबत ग्रामसभेत चर्चा करावी. अशा चर्चा ग्रामसभेत झाल्यानंतर ग्रामसभेने ठरविलेल्या कार्यक्रमांना/उपक्रमांना/विकास योजनांचा/प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून सदर विकास आराखड्यास १५ व्या वित्त आयोगाकडून प्राप्त होणाऱ्या एकूण निधीचे वाटप शासन नियमा प्रमाणे करावे. उद्योगांकडून सीएसआर या उत्पन्न स्रोतांचाही प्रभावी उपयोग
ग्रामविकासासाठी ग्रामपंचायतीने करून घ्यावा. त्यांचाही समावेश ग्रामविकास आराखड्यात असणे आवश्यक आहे. असे स्पष्ट आवाहन केले.
त्या वेळी गट विकास अधिकारी, श्री.आर.ओ. वाघ, गट शिक्षण अधिकारी श्री. अविनाश पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. एस. आर. धनगर, पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती. डॉ. स्वेता मॅडम, सहा गट विकास अधिकारी श्री. एस.टी. मोरे, विस्तार अधिकारी श्री. जितेंद्र पी. पाटील, आर.टी. सैंदाणे, तालुका पेसा समन्वयक श्री. प्रदिप बाविस्कर, प्रविण प्रशिक्षक श्री. सुनिल वाणी, वाल्मीक सोनवणे, सुनिल अहिरराव, तसेच तालुक्यातील सर्व सरपंच ग्रामसेवक, सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.