ताज्या बातम्या

पदवीधर प्रकोष्ठ (सेल) भाजपा महाराष्ट्र राज्य नाशिक ग्रामीण जिल्हा सहसंयोजक पदी उमेश कोळी

जळगाव – भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या पदवीधर प्रकोष्ठच्या सहसंयोजक (नाशिक ग्रामीण) उमेश भगिरथ कोळी रा.पातोंडी ता.रावेर जि.जळगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आदेशान्वये व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील आपले कार्य व योगदान ध्यानात घेता, संघटन कौशल्याने पदवीधर प्रकोष्ठच्या माध्यमातून पदवीधरांच्या विविध समस्या समजून घेवून, त्या सोडविण्यासाठी व पदवीधरांच्या उन्नतीसाठी निश्चितच अथक परिश्रम करेल असे प्रतिपादन उमेश कोळी यांनी केले आहे.

त्यांच्या नेतृत्व क्षमता, सामाजिक बांधिलकी संघटन कौशल्य व कार्य तत्परता या गुणांचा पदवीधर प्रकोष्ठला नक्कीच फायदा होईल. अशी इच्छा प्रदेश पदवीधर संयोजक प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य श्री.धनराज देविदास विसपुते सर यांना व्यक्त केली आहे. उमेश कोळी हे रावेर तालुका युवा मोर्चा प्रसिद्धी प्रमुख, दै. काव्यरत्न जिल्हा प्रतिनिधी व लोकनायक न्यूज तालुका प्रतिनिधी असं त्यांचं कार्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *