ताज्या बातम्या
पाचोरा भडगाव मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी मोठी चुरस ! विद्यमान आमदाराचा कस लागणार !

प्रतिनिधी – अमीन पिंजारी
पाचोरा भडगाव मतदार संघात यावेळी निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे. इच्छुक उमेदवारांची यादी वाढल्याने विद्यमान आमदार किशोर पाटील यांची धाकधूक वाढली वाढली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून पाचोरा भडगाव मतदार संघात अनेक उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्व उमेदवार सज्ज झाले असून प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे. पाचोरा भडगाव मतदार संघावर कोणत्या एका पक्षाचा प्रभाव राहिलेला नाही. यावेळी मतदार संघाच्या जनतेचा कौल कुणाकडे असेल, हे राजकीय तज्ञही सांगू शकत नाही. यामुळे येणाऱ्या निवडणुकीला प्रत्येक उमेदवाराला मोठी कसरत या मतदार संघात करावी लागणार आहे.