पिक विमा कंपनीतील अधिकाऱ्यांची क्षेत्रभेट

चोपडा प्रतिनिधी / विनायक पाटील
भारतीय अर्थव्यवस्था ज्या मुख्य घटकावर आधारलेली आहे ती म्हणजे शेती आणि ती पिकवणारा शेतकरी.पण बदललेले हवामान किंवा नापिकीमुळे अनेक शेतकरी दरवर्षी हवालदिन होतात.बऱ्याच वेळा अवकाळीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.तसे होऊ नये म्हणून शासनाच्या निर्देशानुसार अनेक शेतकरी सध्या पीक विमा योजनेकडे वळलेले दिसतात. बाह्य स्त्रोताद्वारे किंवा बँकेद्वारे फळ पिकांवर आधारलेला पिक विमा अनेक शेतकरी काढतात यातीलच एक भाग म्हणून ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे आणि संबंधित पिक विमा कंपनीकडे आपले प्रस्ताव सादर केले आहेत त्यांची पडताळणी करण्यासाठी पिक विमा कंपनीतील काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नुकतीच सनपूले ता.चोपडा येथील परिसराच्या शेत शिवाराला प्रत्यक्ष भेटी देऊन पडताळणी केली.केळी या फळपिकासाठी आंबिया बहार या रब्बी हंगामातील पिक विमा योजना संदर्भात ए.आय.सी. इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी अतुल झंकार व त्यांचे सहकारी निलेश कोंदे यावेळी हजर होते. तसेच लक्ष्मण जगन्नाथ पाटील, भूषण पाटील, ताराचंद जयसिंग, सागर पवार आदी शेतकरी उपस्थित होते.