महाराष्ट्र

पुणे – फुरसुंगी गाव, पुणे मनपा अथवा हडपसर मनपा हद्दीत तातडीने समाविष्ट करण्याची मागणी

पुणे – “विकासाची घोषणाबाजी, कागदपत्रांची थप्पी, प्रकल्प सारे स्वप्नात, एप्रिल फुल झोकात” राज्य शासनाने “पुण्यातील फुरसुंगी गावाची स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या निर्णयाने” स्थानिक मतदार जनतेला “एप्रिल फुल” करणे त्वरित बंद करावे. तसेच फुरसुंगी गाव, पुणे मनपा अथवा हडपसर मनपा मध्ये तातडीने समाविष्ट करावे यासंदर्भात जिल्हाधिकारी पुणे यांना नागरिकांच्या हरकती व मागणी साठी निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर मागणी फुरसुंगी गावाच्या सौ दिपाली सरदेशमुख यांनी केली आहे.

सविनय मागणी : ——-

1. सर्वसामान्यांना आवश्यक सेवांपासून वंचित राहावे लागणार नाही यासाठी फुरसुंगी व उरुळी देवाची फक्त याच दोन गावासाठी स्वतंत्र नगरपालिका न करता या गावांना नवीन प्रस्तावित हडपसर महानगरपालिकामध्ये अन्यथा पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश करावा”.

2. पुणे महानगरपालिका व नजीकच्या हद्दीमध्ये समाविष्ट सर्व गावांमध्ये झालेल्या सर्व विकासयोजनांचे , बदल्यांचे CAG ऑडिट झाले पाहिजे.

3. टीपी स्कीम बाबत निर्णय 

राज्य सरकारने उरुळी देवाची (टीपी स्कीम-६) आणि फुरसुंगी (टीपी स्कीम-९) येथे ३७१ हेक्टर क्षेत्रावर दोन नगररचना योजनांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी दिली होती. या दोन्ही ‘टीपी स्कीम’ करण्यासाठी महापालिकेला सुमारे ७०० कोटी रुपये खर्च येणार होता. मात्र, विकास आराखडा जाहीर होण्याचा अंतिम टप्प्यामध्ये असताना फुरसुंगी गावाची स्वतंत्र नगरपालिका निर्णय घेत राज्य शासनाने गावाच्या विकासाला खीळ बसवला आहे.

4. “विकासाची घोषणाबाजी, कागदपत्रांची थप्पी, 

    प्रकल्प सारेच स्वप्नात, एप्रिल फुल झोकात” 

राज्य शासनाने मतदार जनतेला एप्रिल फुल करणे त्वरित बंद करावे.

5. पुण्याएवढं पाण्याच्या बाबतीत समृद्ध, नशीबवान शहर नाही. पण पाण्याचे असमान वाटप, टॅंकरलाॅबी आणि महापालिका यांचे राजकीय आर्थिक हितसंबंध, पाणीचोरीद्वारे विनापरवाना, स्थानिक रहिवासी नागरिकांना कॅनॉल मधील पाण्याची मक्तेदारीयुक्त बेकायदा विक्रीद्वारे करोडोंचा जलविक्री घोटाळा, सक्रिय टँकरलॉबीच्या मक्तेदारीद्वारे नागरिकांची दुहेरी सक्तवसुलीद्वारे लूट व त्यांनी तयार केलेली कृत्रिम पाणीटंचाई या कारणांमुळे शहरात सर्वांना पाणी मिळत नाही.पाण्याचा करोडो रुपयाचा उलाढाल होते. सामान्य नागरिकांच्या खिशातून पाण्याचे पैसे दिले जातात. नागरिक क्रांतिकारक पाऊल उचलू शकतात. प्रामाणिक करदात्यांना सर्व नियम आणि बेकायदा वागणाऱ्यांना शासनामार्फत संपूर्णतः बेकायदा सूट असा गैरकारभार व आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

6. टँकरलॉबी मागील राजकीय स्थानिक लोकप्रतिनिधींचे चेहरे लोकांना कळू देत. आपल्या वाटचे पाणी कोण पळवत आहे ते! टँकर गुंडांना कोणाचे अभय आहे? पाणी संदर्भात नागरिकांनी तक्रार केल्यास संबंधितांना टँकरलॉबीच्या गुंडांमार्फत मारहाण केली जाते त्यामुळे कोणीही नागरिक या संदर्भात तक्रार करण्यास पुढाकार घेत नाहीत त्यामुळे नागरिकांना अतिशय दहशतीच्या परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे. कोण कोण नेते मंडळी किंवा त्यांचे समर्थक, हस्तक, संबंधी यात गुंतले आहेत ते पारदर्शक चौकशीद्वारे जनतेसमोर तपशीलवार जाहीर करा. जल जीवन मिशन योजनेतील कामांचा दर्जा तपासण्यासह वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी.

7. पुणे मनपा व समाविष्ट इतर गाव कार्यक्षेत्रातील पोलीसचौकी स्थानिकलोकप्रतिनिधींच्या मालकीच्या जागेतअसल्याने,जनतेच्यातक्रारी पोलीसप्रशासन व लोकप्रतिनिधी संगणमताने मॅनेज करत आहेत. मोठ्या हाउसिंग सोसायटीसमोर रहिवासी जागेमध्ये बेकायदा बार रेस्टॉरंट अवैधधंदे गुंडगिरी , महिलांना त्रास देणे असे प्रकार सुरू, त्यामुळे फुरसुंगी पोलीस चौकीला शासकीय जागा द्यावी.

8. फुरसुंगी परिसरात दररोज अनेकठिकाणी विविध राजकीय पक्ष व्यक्ती संस्था यांनी स्वतःचे जाहिरातींचे, स्वतःच्या राजकीय पदाचे दिशादर्शक फलक , रहिवासी स्थानांचे बॅनर्स दररोज नवीन अनधिकृतपणे मोठे होर्डिंग,बॅनर्स चुकीच्यापद्धतीने लावून फ्लेक्सबाजी केलेली आहे. मोठे बॅनर्स होर्डिंग अचानक पडले तर नागरिकांची जीवितहानी होऊशकते. पुणे मनपा अधिकारी व कर्मचारी

कारवाई न करता तक्रार परस्पर बंद व गायब करणारे जीवितहानीस जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी.

9. फ्लेक्स बेकायदेशीर असेल तर कधी कारवाई करणार? संपूर्ण फुटपाथ ब्लाॅक केलाय, पायी चालणाऱ्यांनी चालायचे कसे? 

10. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यातर्फे तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन व नळ जोडणी करत 24/7 जलद गतीने पाणीपुरवठा करावा. 

11. जनतेचा पैसा वाया घालवणाऱ्या सर्व दोषी अधिकारी व नगरसेवकांवर कारवाई करा. शहराचा, गावाचा व नागरिकांचा पायाभूत मूलभूत सोयी सुविधा यासह सर्वांगीण विकासाचा नागरिकांना अधिकार आहे.

12. रस्त्यावर झालेल्या मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणामुळे सासवड रोड भेकराईनगर गंगानगर येथे पायी चालणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. रस्त्यावर बेकायदा विक्री करणारे दररोज नवीन लागणारे फेरीवाले हातगाडे यांच्याकडून अनेक लोकप्रतिनिधी सक्तीची वसुली सुरू आहे जनजीवन वेठीस धरण्याचे प्रयत्न सतत सुरू असून यामुळे नागरिकांना दहशती खाली जगावे लागत आहे. रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वांसाठी बनवला जातो शासन प्रचलित नियमानुसार नियमांचे पालन करत फुरसुंगी मधील सर्व प्रभागातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात यावे. कोणत्याही कामाचा निधी आला की जनतेला सुविधा कमी तर नगरसेवक व आमदारांना कमिशन आणि भ्रष्टाचार यामुळे आर्थिक फायदा जास्त होतो. खड्डे पूर्ण रस्त्यांची दुरावस्था पाहता अपघात व जीवित हानी होऊ नये यासाठी तातडीने दखल घेत रस्ता रुंदीकरण विना विलंब कार्यान्वित करा. संडे मुक्त रस्ते बनवण्यासाठी जास्त निर्माण करणाऱ्या कंत्राटदार अधिकारी अभियंता यांच्यावर उत्तरदायित्व फिक्स करा.

13. लोकशाहीत लूट नको. वरील सर्व कामांसाठी निधीची कमतरता होणार नाही याबाबत पारदर्शकपणे नियोजन करावे. संदर्भातील सर्व माहिती देण्यात यावी.

धन्यवाद !

सौ दिपाली सरदेशमुख ,

पार्क इन्फिनिया , 

भेकराई नगर , फुरसुंगी 

पुणे -412 308.

मोबाईल : 9420124330 / 7620303790

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *