ताज्या बातम्या

पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालयात आनंद तरंग कार्यक्रम…

धरणगाव – तालुक्यातील साळवे येथील ग्रामसुधारणा मंडळ संचलित पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनानिमित्ताने आनंद तरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला यात ज्यूनियर,सिनियर के जी व पहिली ते चौथीच्या बाल कलाकारांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सराव त्यांच्या शिक्षिका श्रीमती वर्षा नेहेते, सारिका नेहेते, कांचन अत्तरदे व अनिता अहिरे यांनी केले. परिसरातील पालक आणि संस्थेचे संचालक मंडळाने लहान बालगोपालांचे कौतुक केले, अभिनंदनाचा वर्षाव केला, शुभेच्छा दिल्या आणि भरपूर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *