पोलीस स्टेशनचं छत रिपेरिंग करण्यासाठी चक्क विकल्या जप्त केलेल्या नऊ मोटारसायकल ; चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस निरिक्षिकेचा प्रताप
लोकनायक न्युज करिता प्रतिनीधी लतीश जैन, चोपडा जिल्हा जळगांव

पत्रकारांशी देखील केली अरेरावी
चोपडा – येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस निरिक्षिकेचा अजब गजब कारभाराची खमंग चर्चा काल दिवसभरापासून चोपडा शहरात सुरू आहे.चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त असलेल्या मोटार सायकली कोणताही लिलाव, कोर्टाची ऑर्डर नसताना अथवा वरिष्ठांची परवानगी नसतांना चक्क नऊ मोटारसायकल परस्पर विक्री केल्या आहेत. ही चर्चा संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली. चोपडा शहरातील समता नगर येथील रहिवासी जुनेद नावाच्या इसामाला या मोटरसायकल विकल्याचे समजते. जुनेदचा अजून एक साथीदार असल्याचे बोलले जात आहे.या जुनेदला या नऊ मोटारसायकली 38 हजार रुपयात परस्पर विकल्या आहेत. त्यामुळे शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहेत.याबाबत पत्रकारांनी अधिक माहिती घेतली असता ज्या इसमाने संबंधित मोटरसायकली विकत घेतल्या आहेत त्याने पत्रकारांना याबाबत प्रतिक्रीया दिली आहे.” मी 38 हजार रुपयाला नऊ मोटरसायकली विकत घेतल्या आणि ग्रामीणच्या पीआय कावेरी कमलाकर यांच्या सांगण्यावरून एका व्यक्तीचा नंबर दिला असता त्यावर मी फोन पे द्वारे ही रक्कम दिली असल्याचे त्याने सांगितले. तो नंबर कर्मचाऱ्याच्या होता की, कोणाचा होता ? मला माहित नाही. असे जुनेद ने सांगितले.याबाबत पत्रकारांनी पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना प्रत्यक्ष भेट घेतली असता कावेरी कमलाकर यांनी मोटारसायकली विकण्याला दुजारा दिला. आणि सदर रक्कम पोलीस स्टेशनचं छत रिपेरिंग करायचे आहे. त्यामुळे मी ह्या मोटारसायकली विकल्या आहेत असे त्यांनी सांगितले. याबाबत संबंधित माणसाकडून पेमेंट मागवलेले आहे. असे म्हटले. मात्र त्यांनी कमेर्यासमोर बोलण्याचे टाळले आणि पत्रकरांवरच त्या संतापल्या.त्यांनी चिडून अरेरावीची भाषा बातमी लावू नका म्हणत संतापल्यात.याबाबत वरिष्ठांशी संपर्क केला असता तो होवु शकला नाही.
