प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धांचे थाटात उद्घाटन ; बियाणी मिलिटरी स्कूल येथे आयोजन
चोपडा : प्रतिनिधी विनायक पाटील
एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय,यावल आयोजित “लक्षवेध क्रीडा महोत्सव” सन २०२४-२५ चे आयोजन भुसावळ स्थित बियाणी मिलिटरी स्कूल येथे करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक हे होते तर उद्घाटक म्हणुन संगीता बियाणी यांची उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण उपायुक्त योगेश पाटील,जिल्हा नियोजन अधिकारी विजयजी शिंदे,प्रकल्प अधिकारी अरुणजी पवार,प्राचार्य डी.एम.पाटील यांची उपस्थिती होती.मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन आणि क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. चाळीसगाव,चोपडा,यावल आणि अमळनेर बिटच्या खेळाडूंनी पथसंचलन सादर केले.सर्वांनी क्रीडा शपथ घेतली.”निरोगी शरीरात निरोगी मन वास करते” म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात क्रीडेचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे.आपण स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडाव्यात,आदिवासी खेळाडूंनी शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे तसेच अनुदानित शाळांना पटांगण किंवा साहित्यांसाठी सात लक्ष रुपयांचे वितरण जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून वितरित आपण करीत असतो असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.दोन दिवस आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये १३०९ खेडाळूनी सहभाग घेतला.मुख्याध्यापक,क्रीडा शिक्षक,महिला अधिक्षिका,अधीक्षक उपस्थित होते.प्रकल्प कार्यालय यावल नियोजित विविध समित्यांनी आपले कामकाज पार पाडले.