प्रशाकीय अधिकारी व शिक्षक गौरव पुरस्कारातुन पुरस्कारार्थी प्रेरणा घेवुन चांगले काम करतील : कडू
राहुरी प्रतिनिधी | आशिष संसारे
पाटील मराठी व उर्दु शाळेने गौरव पुरस्काराची अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणली
वार्षीक स्नेहसंमेलनांत मुलामुलींचे पालकवर्गातुन कौतुक होते. प्रशासन आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी आणि शिक्षकांचा सन्मान करणे हि अनुकरणीय बाब आहे. विद्यार्थी घडवताना व प्रशासन चालवताना जे अपार कष्ट घेतले जातात त्यातुनच विद्यार्थी आणि समाज घडत असतो. ते घडण्यास कारणीभुत ठरणाऱ्या घटकांचा पुरस्कार देवुन सन्मान करण्याची अभिनव कल्पना मराठी व उर्दु शाळा व्यवस्थापन समीतीने प्रत्यक्षात आणली हि अंत्यत कौतुकास्पद बाब आहे. या पुरस्कारातुन पुरस्कारार्थी प्रेरणा घेवुन आणखी चांगले काम करतील अशी आशा मुंबई मंञालयातील सेवानिवृत्त सचिव दत्ता पाटील कडू यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरुन मुंबई मंञालयातील सेवानिवृत्त सचिव दत्ता पाटील कडू बोलत होते.यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे, देवळाली प्रवरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतिष वाळूंज,माजी नगरसेवक विश्वास पाटील, पञकार रफीक शेख,गणेश अंबिलवादे,डाँ.संदीप मुसमाडे, संतोष चोळके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे,माजी अध्यक्ष सुनिल शेटे, उपाध्यक्षा शोभा मोरे,रंजना कांबळे, अश्विनी निकाळे,योगिता तरस,अमोल भांगरे, नानासाहेब होले, प्रमोद गाडे,मच्छींद्र सरोदे,केंद्र प्रमुख निलिमा गायकवाड, प्रभारी मुख्याध्यापक हसन शेख, उर्दुचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमर शेख, अजिज शेख,मौलाना अबुबकर शेख,आदी उपस्थित होते. यावेळी प्रशासकीय गौरव पुरस्कार देवळाली प्रवरा नगर पालिकेचे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक यांना दत्ता पाटील कडून यांच्या हस्ते तर मराठी शाळेच्या शिक्षिका सुप्रिया आंबेकर यांना शिक्षक गौरव पुरस्कार गट शिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे यांच्या हस्ते तर उर्दु शाळेचे शिक्षक मोहम्मद असीफइक्बाल आरिफ यांना शिक्षक गौरव पुरस्कार साई आर्दशचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त व्यक्तींना सन्मान चिन्ह व मानपञ देण्यात आले. यावेळी दत्ता पाटील कडू म्हणाले की, मराठी व उर्दु शाळेने एकञ येवुन प्रशासकीय अधिकारी गौरव पुरस्कार व शिक्षक गौरव पुरस्कार सुरु केले आहे. प्रशासन आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी आणि शिक्षक समाजा पासुन दुर्लक्षित झाला आहे.आपणास ठेच लागली तरच या दोन्ही घटका पर्यंत आपण जातो.अन्यथा या दोन्ही घटकांकडे दुर्लक्ष करीत असतो. शिक्षक व प्रशासकीय अधिकारी गौरव पुरस्काराची अभिनव कल्पना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पञकार राजेंद्र उंडे यांनी प्रत्यक्षात आणली आहे. पुरस्कार देवुन सन्मान करणे हि अनुकरणीय बाब आहे. विद्यार्थी घडवताना व प्रशासन चालवताना जे अपार कष्ट घेतले जातात त्यातुनच विद्यार्थी आणि समाज घडत असतो. ते घडण्यास कारणीभुत ठरणाऱ्या घटकांचा पुरस्कार देवुन सन्मान करण्याची अभिनव कल्पना मराठी व उर्दु शाळा व्यवस्थापन समीतीने प्रत्यक्षात आणली हि अंत्यत कौतुकास्पद बाब आहे. आसे कडू यांनी सांगितले. यावेळी गट शिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे, शिवाजीराव कपाळे, पञकार रफिक शेख यांनी पुरस्कार प्राप्त अधिकारी व शिक्षक यांना शुभेच्छा देवून पुरस्कार मिळाल्यानंतर पुरस्कार्थींची जबाबदारी वाढली आहे.असे सांगितले.कार्यक्रमचे सुत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे व स्वाती जोशी यांनी केले.जेष्ठ शिक्षिका सुनिता मुरकुटे आभार प्रदर्शन केले.