प.रा.विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

धरणगाव प्रतिनिधी:अजय बाविस्कर
धरणगाव -येथील प.रा. विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती संयुक्त रित्या साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ.आशा शिरसाठ होत्या.मंचावर ज्येष्ठ शिक्षक डॉ.बापू शिरसाठ, डॉ.वैशाली गालापुरे, प्रदीप असोदेकर, गणेश सूर्यवंशी, संदीप घुगे उपस्थित होते.अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविकात शिक्षक संजय बेलदार यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. उपस्थित मान्यवरां पैकी डॉ .बापू शिरसाठ यांनी महात्मा गांधीजींनी भारताला अहिंसेचे सांगितलेले महत्त्व विशद केले.अहिंसा हे गांधीजींच्या जीवनातील स्वातंत्र्यलढ्यातील चळवळीचा आधारस्तंभ बनले. अहिंसेच्या माध्यमातून प्रतिकार करणे किंवा लढा देणे हे लोकांसाठी सर्वात शक्तिशाली शस्त्र असल्याचे सांगितले. कार्यक्रमात शिक्षक गणेश सूर्यवंशी यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश झोत टाकला. जय जवान, जय किसान या त्यांनी दिलेल्या घोषणेबद्दल सविस्तर माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका डॉ.आशा शिरसाठ यांनी गांधीजींच्या जीवनाचे तत्त्वज्ञान, कार्य किंवा वैयक्तिक आयुष्य बद्दल जाणून घेणे किती गरजेचे आहे हे सांगितले. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाची महती आजही कायम असल्याचे सांगितले. महात्मा गांधीजींचा सर्वात प्रमुख विचार म्हणजे अहिंसा. हिंसा न करता संघर्ष करणे. त्यांनी सत्याग्रह तत्त्वानुसार अन्याया विरुद्ध शांततेच्या मार्गाने लढा दिला.महात्मा गांधीजींच्या विचारधारेत सामाजिक सुधारणा, जात व्यवस्थे विरुद्ध लढा आणि स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन देणे यांचा समावेश होता हे आवर्जून सांगितले.आभार कलाशिक्षक राजेश खैरे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.