बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात अमृत महोत्सवी ध्वजारोहण व विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा
धरणगाव – येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात 15 ऑगस्ट रोजी शाळेचा माजी विद्यार्थी भारतीय सैनिक विशाल पुंडलिक वऱ्हाडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पूर्ण शहरांमध्ये शाळेने तयार केलेले सजीव चित्ररथ थोर, पुरुष,थोर देशभक्त यांचे सजीव देखावे सजवलेल्या ट्रॅक्टरवरती भारत माता त्याचप्रमाणे रॅलीमध्ये शाळेतील लेझीम पथक, झांज पथक सोबत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या हातात देशभक्तीचे फलक देऊन देशाबद्दलच्या घोषणा देऊन प्रभात फेरी काढण्यात आली. त्याचप्रमाणे साने पटांगण व शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शाळेतील विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर अर्थात वीरांना श्रद्धांजली व साने पटांगण वरती बालक मंदिराच्या चिमुकल्यांनी विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. शाळेतील प्रभात फेरी अतिशय नयनरम्य मनोहर असल्याने पूर्ण शहरांमध्ये आनंदाचे व प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झालेले होते. शहरातील लोक आपापल्या मोबाईलमध्ये सुंदर अशा रॅलीचे दृश्य टिपत होते. शहरात प्रभात फेरी सोबत संस्थेचे अध्यक्ष हेमलाल भाटिया,सचिव प्रा.रमेश महाजन,संचालक मंडळातील सर सदस्य तसेच मुख्याध्यापक जीवन पाटील,मुख्याध्यापक एस एस पाटील यांनी खास सोबत राहून प्रेरणा दिली. शाळेमधील रांगोळी स्पर्धा व देशभक्तीपर चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. अमृत महोत्सव निमित्त आठवडाभर पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम,विविध स्पर्धा व बालक मंदिर व पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेला होता. या उपक्रमासाठी अमृत महोत्सव उपक्रम समितीचे प्रमुख महेश आहेराव तसेच समितीतील सर्व सदस्य त्याचप्रमाणे सांस्कृतिक समितीचे प्रमुख कैलास माळी समितीतील सदस्य व सर्व पथकांना सहकार्य करणारे किरण चव्हाण त्याचप्रमाणे साने पटांगण यावर अतिशय सुंदर रित्या सादर झालेले वीरांना श्रद्धांजली अशा या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमची तयारी पल्लवी मोरे वर्ग शिक्षक वाय पी पाटील यांनी केलेले होते.कार्यक्रमा नंतर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडून शाळेचे मुख्याध्यापक एस एस पाटील मुख्याध्यापक जीवन पाटील शाळेतील ज्येष्ठ कर्मचारी शिरीष बयस सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख कैलास माळी यांचे रोप व प्रशस्तीपत्र देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला . त्याचप्रमाणे शाळेतील रांगोळी स्पर्धेसाठी सरोज तारे, आर पी पवार ,जयश्री बोरसे यांनी नियोजन केले. शाळेतील चित्र प्रदर्शनासाठी शाळेतील कलाशिक्षक त्याचप्रमाणे एन पी वाणी यांनी नियोजन केले. स्पर्धेसाठी स्पर्धा समिती प्रमुख एस एस देसले, डी आर चव्हाण, सागर पाटील यांनी स्पर्धेचे नियोजन केले. तसेच बालक मंदिर विभागातील प्रमुख मीनाक्षी वारुळे व सर्व शिक्षिका यांनी बालक मंदिरच्या विद्यार्थ्यांचे अतिशय सुंदर असे कार्यक्रम बसवून लोकांची वाहवा मिळवली या सर्व कार्यक्रमांसाठी शाळेतील दोघही विभागाचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचेही खूप मोठे सहकार्य लाभलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी खूप परिश्रम घेतले