बिड – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धामणगाव येथे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान
प्रतिनिधी - बुवासाहेब महाजन
बिड – आष्टी तालुक्यातील धामणगाव-वंजारवाडी हाकेवाडी या ग्रामपंचायती च्या सहकार्याने व महिला व बालविकास विभागातर्फे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रांत उत्तम कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा बुधवार (ता. ३१) धामणगाव ग्रामपंचातीच्या इमारतीमध्ये सन्मान करण्यात आला आहे . धामणगाव येथील सौ मनिषा आत्मराम धुमाळ (अंगणवाडी कार्यकर्ती) सौ वैशाली बाळासाहेब कुदळे (बचत गटअध्यक्ष) वंजारवाडी येथील सौ राणी भिमराव महाजन (अं.सेविका) स्नेहल आबासाहेब बेद्रे ( उमेद CRP) हाकेवाडी येथील क्रांती गोकुळ बोराडे( आशा स्वयंसेविका) विजया बुवासाहेब महाजन (अंगणवाडी सेविका) ह्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान चिन्हं देऊन गौरविण्यात आले.
“जगाची आई, कोण तुझ्याशी लढेल..|| तू मुलांची आई आहेस, तुला कोण नाकारेल.. तू तुझ्या पतीची सावली आहेस, तुला कोण रोखेल..|| बापाचा वाघ तू तुझ्यापुढे सारी दुनिया नतमस्तक करशील..II ती माऊलीची लेक तू जो तुझ्या सोबत जिंकणार.. | एका जन्मात तुझी अनेक रूपे तू सर्व गुणांनी संपन्न आहेस…|| पण सर्व सद्गुणांनी संपन्न…||पण गर्व, पण स्वाभिमान, पण धन्य पण सर्व गुणांनी संपन्न..II
समाजातील महीला प्रवाहात आणण्यासाठी होतकरू महिलांच्या पाठीवर प्रोत्साहनपर कौतुकाची थाप देण्याचा महीला बालविकास विभागाच्या हा प्रयत्न आहे. पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारराच्या माध्यमातून नेतृत्वाची चमक दाखवून स्वतःसोबतच समाजाचा विकास करणाऱ्या समाजातील महिलांचा महिला बालविकास विभाग महाराष्ट्र शासन च्या व ग्रामपंचायतीच्या वतीने गौरव करण्यात आला. त्यासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला धामणगावच्या सरपंच श्रीमती संजना रावसाहेब गाढवे.ग्रामसेवक सायंबर साहेब. संजय नाना गाढवे.उपसरपंच डॉ अकील सय्यद. संजय महाजन (सरपंच) खंडू हाके.बाळासाहेब निकम. शरद चौधरी. नामदेव जीवडे. बुवासाहेब महाजन. गोकुळ बोराडे. सुरेश कांबळे. महाजन. पत्रकार दादा पवळ. गहिनीनाथ बोराडे. आदी मान्यवर उपस्थित होते.