ताज्या बातम्या

बुधागड शेत शिवारामध्ये शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

अमरावती / प्रतिनिधि – गजानन खोपे

खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बुधागड शेत शिवरामध्ये ५९ वर्षीय शेतकऱ्याने दोरीच्या साह्याने निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकताच घडली
दादाराव बळीराम तानोळकर वय ५९ रा. बुधागड असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे,

दादाराव यांच्यावर कर्जाचा डोंगर असल्याने कर्जाची परतफेड कशी करावी आणि सततच्या नापिकीमुळे या विंचनेतून शेतकऱ्याने गळफास लावून जीवन संपवले मृतकाच्या नातेवाईकांनी थेट खोलापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली त्यांच्या तक्रारीनुसार खोलापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली, घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलिसांचे ठाणेदार ईश्वर वर्गे पोलीस ताप्यासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेहशवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आला सदर घटनेचा तपास ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस आय. कैसर खान, फिरदोस पुढील तपास खोलापूर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *